ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलन हिंसक झाले तर कोण जबाबदार? पाटलांना उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविला असून आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको ही भूमिका मांडली. यानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २४ फेब्रुवारीपासून मोठं आंदोलन सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने कडक भूमिका अवलंबली आहे. मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहे? आंदोलन हिंसक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींना मोठा झटका, झारखंड HC ने याचिका फेटाळली, आता कनिष्ठ न्यायालयात सुरू राहणार खटला

रांची : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 2018 मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी निकाल देताना राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. एमपी-एमएलए न्यायालयाच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती आज उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनाने महाराष्ट्र भावुक, नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झालं. त्यांना काल २२ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रगल्भ नेतृत्व हरपल्यामुळे महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी मनोहर जोशींची आठवण व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी..!’ नव्या पक्षचिन्हाबाबत कशी आहे नेत्यांची भावना?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे नाव दिलं होतं. त्यावेळी पक्षचिन्ह देण्यात आलं नव्हतं. शरद पवार गटाकडून वटवृक्ष या चिन्हाचा पर्याय देण्यात आला होता. मात्र काल २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कारंजा विधानसभेचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन

मुंबई : भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. त्यातच आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडण्या काम […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत काँग्रेसचा हात ‘आप’सोबत, 4-3 चा फॉर्म्युला अखेर ठरला!

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावर एकमत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक दोघेही एकत्र लढणार आहेत. आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाबाबत काँग्रेस आणि आपमध्येही मतभेद दूर झालेले आहेत. लवकरच दोन्ही पार्टी अधिकृतपणे जागावाटपाची घोषणा करतील. या आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही पार्टी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल केलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळासाहेबांनी तीन वर्षे मला वचन दिलं होतं’, परंतू…; स्मिता ठाकरेंची मुलाखत चर्चेत

X: @therajkaran मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि एकेकाळी राजकीय वर्तुळात चर्चिल्या गेलेल्या स्मिता ठाकरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. त्यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली. गेल्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर स्मिता ठाकरे पुन्हा राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साहेबांकडून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर हायकोर्टाने मैतेई समाजाच्या आरक्षणाचा परिच्छेद हटवला, जातीय हिंसाचाराचं ठरलं होतं कारण

X: @therajkaran नवी दिल्ली : मणिपूर उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमाती (ST) मध्ये करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. २७ मार्च २०२३ ची सूचना राज्यात जातीय हिंसाचाराच्या उद्रेकाचं कारण असल्याचे म्हटले जात होते. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यात जातीय हिंसाचाराने उग्र स्वरूप धारण केले होते. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 200 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलन धोक्यात? बारस्करांनंतर संगीता वानखेडेंचे जरांगेवर धक्कादायक आरोप

X: @therajkaran मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वासू सहकारी अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर धक्कादायक आरोप केला. त्यानंतर आज पुन्हा जरांगेंच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांच्या आरोपानंतर मराठा आंदोलन धोक्यात सापडल्याची चिन्हं आहेत. संगीता वानखडे या एकेकाळी मराठा आंदोलनात जरांगे पाटील यांच्या सहकारी होत्या. यावेळी त्यांनी जरांगेंवर घणाघाती हल्ला चढवला. […]