ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाताचा मटनाचा वास गेला असेल…’ म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ता शिल्पा बोडखे यांचा राजीनामा

मुंबई उद्धव ठाकरे गटाच्या विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता म्हणून काम पाहणाऱ्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत कलहाचं कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआमधील जागा वाटप कधी? रमेश चेन्नीथलांनी सांगितली नेमकी तारीख!

मुंबई उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात लोकसभा जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा गुंता सुटणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जिवलग मित्राच्या आरोपानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

जालना किर्तनकार आणि जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे हेकेखोर आहे आणि गुप्त बैठक घेत असल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केला. यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. बारस्करने पैसे घेतल्याचा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरचे माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI चे छापे

नवी दिल्ली माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर सीबीआयने आज (२२ फेब्रुवारी) छापा टाकला. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या काळात एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा केला होता. यापूर्वी 6 […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात तिरंगी लढत, सपा-काँग्रेस युती बसपासाठी धोक्याची?

लखनऊ उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागावाटपावर ठराव झाला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून यातील ८० पैकी १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहेत. उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे, जिथं इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकले आहे. अद्याप पश्चिम बंगाल, बिहार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महानंद आता गुजरातला विकले आहे, जय हो, महानंद की’; जितेंद्र आव्हाडांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार यापुढे गुजरातहून चालवला जाणार असल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संजय राऊतांनंतर जितेंद्र आव्हाडांनी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करीत सरकारला सवाल उपस्थित केला आहे. महानंद आता गुजरातला विकले आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे महायुती सरकारचे पाप’ – नाना पटोले

मुंबई पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त, ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद? विरोधकांचा सवाल

पुणे पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन ड्रग) जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि दिल्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून संताप व्यक्त […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

हरियाणाच्या शंभू सीमेची तुलना पाक बॉर्डरशी; दिल्लीच्या दिशेने जाण्यास शेतकरी ठाम

नवी दिल्ली केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत कोणताही निकाल न लागल्याने शेतकरी नेत्यांनी बुधवारी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. तेव्हापासून दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दुसरीकडे हरियाणाच्या शंभू सीमेवर गोंधळ सुरूच आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारला आव्हान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे हेकेखोर, रोज पलटी मारतो, अनेक गुप्त बैठका घेतो’; अजय महाराज बारस्करांचे धक्कादायक आरोप

मुंबई काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा शिव्या देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी जरांगे पाटलांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईतील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्करांनी जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगे अनेकदा गुप्त बैठका घेतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी […]