मुंबई
महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार यापुढे गुजरातहून चालवला जाणार असल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संजय राऊतांनंतर जितेंद्र आव्हाडांनी सरकारच्या या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करीत सरकारला सवाल उपस्थित केला आहे. महानंद आता गुजरातला विकले आहे, जय हो, महानंद की अशा शब्दात आव्हाडांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी उपरोधिकपणे लिहिलं की, मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा. आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकले आहे!
राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या कारणावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. आता महानंद डेअरीचा कारभार गुजरात हलवण्यात येणार असल्यानेही विरोधक संतप्त आहेत.