महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र चूल की भाजपसोबत जाणार? आघाडीकडे चर्चेसाठी ४८ पैकी २६ जागांचा प्रस्ताव सादर

X : @therajkaran मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघडीच्या बैठकीला वंचितचे प्रतिनिधी लावणार हजेरी

पुणे : महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन […]

महाराष्ट्र

आघाडीची बैठक गुरुवारी घ्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली. महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीला ‘वंचित’ मारणार दांडी, प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या २७ फेब्रुवारी मंगळवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीला अनुपस्थितीत राहणार असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या जाहीर सभेचं कारण पुढे करीत आंबेडकरांनी उपस्थित राहता येणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र मविआने आपली बैठक उद्याऐवजी परवा ठेवली तर आम्हाला सोईचं होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांच्या […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, स्वतःच्या शरीराचा त्याग करण्यात काहीही अर्थ नाही’; प्रकाश आंबेडकरांचा पाटलांना सल्ला

मुंबई आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे, असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे, म्हणून…’; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर घणाघात

पुणे ‘काल ११ फेब्रुवारीला देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील आम्ही चारशेहून अधिक जागा जिंकणार, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत’ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीने मविआला दिलेल्या मसुद्यातील ‘ते’ 39 मुद्दे कोणते, सविस्तर जाणून घ्या!

मुंबई वंचित बहुजन आघाडी अद्याप मविआचा अधिकृत भाग झालेले नाही. मविआत सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मविआला मसुदा देणार आहे. यावर तिन्ही पक्षांची चर्चा होईल आणि यावर एकमत झाल्यानंतर मविआ पुढील रणनीती आखणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मसूद्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश, जाणून घेऊया… 1) मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे. अस्तित्वात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नाना पटोले युतीच्या विरोधात आहेत का? पुंडकरांच्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा

मुंबई महाविकास आघाडीचं ठरलं असं म्हणत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांची युती तोडण्याची भूमिका असल्यास आघाडी कशी होणार? असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीत पहिल्यांदाच आंबेडकरांची उपस्थिती; बाहेर आल्यानंतर अशी होती पहिली प्रतिक्रिया

मुंबई महाविकास आघाडीच्या बैठकी आज पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. मविआतील घटकपक्ष पुढील टप्प्यात जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करतील. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहोत. ही चर्चा आज अर्धवट राहिली. त्यावर पुढील बैठकीत चर्चा […]