महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन पक्ष फोडूनही भाजप पिछाडीवर!

X: @vivekbhavsar मुंबई: आजपासून 12हा 13 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2012 च्या आसपास नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झालेला होता. समाज माध्यमांचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची विकास पुरुष आणि गुजरातचे विकास मॉडेल हे देशभर लोकांच्या मनात रुजवले होते. मोदींबद्दल एक अपेक्षा आणि आशा निर्माण झाली होती. त्यातूनच पुढे 2014 च्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आडम मास्तरांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सोलापूर मध्य मतदार संघावर दावा

X : @vivekbhavsar काँग्रेससह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे जवळपास २६० जागांवर एकमत झाले आहे. २८ जागांबाबत अजूनही वाद सुरू आहेत. या २८ जागांमध्ये खास करून समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य छोट्या घटक पक्षांना किती जागा द्याव्या, यावरून वाद सुरू  आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 12 जागांची मागणी केली होती, मात्र चार जागांवर त्यांचा […]

मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील मविआचे यशाने उत्साह

X : @therajkaran मुंबई: महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मिळालेले यश हे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरले आहे. आता विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly election 2024) जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवार निवडीच्या बैठका सुरु असताना घाटकोपर पश्चिम विधानसभा (Ghatkopar West Assemby constituency) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी अॅड. अमोल मातेले (Adv Amol […]

महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा;  आशिष शेलार यांची मागणी

X : @NalawadeAnant मुंबई – शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत आहे. बुधवारी मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या […]

महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन 

X : @NalawadeAnant मुंबई – आमचे सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते.  ते म्हणाले, मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा १५० एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करण्यात […]

महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे लढणार वर्सोव्यातून? मोहित कंबोज असतील भाजप उमेदवार?

X: @vivekbhavsar मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार X : @therajkaran मुंबई राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे […]