ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, अटकेची शक्यता?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. याशिवाय ईडी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. रोहीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP MLA Disqualification : बंद कपाटातील महत्त्वाची कागदपत्रं गहाळ? आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांना दिलेल्या उत्तरामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाडांची उलटसाक्ष नोंदवण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

NCP आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी

मुंबई राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे. आज सकाळी या सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंती पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. याशिवाय अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! एकाच दिवसात मविआच्या दुसऱ्या नेत्याला ईडीकडून नोटीस

मुंबई आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकांपूर्वी मविआच्या नेत्यांना मोठा दणका दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काही तासांपूर्वी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स जारी केलं आहे. एकाच दिवसात मविआच्या दोन नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘न्यायव्यवस्थेतील आरक्षणा’बाबत जितेंद्र आव्हाडांची स्पष्ट भूमिका, पुन्हा नवा वाद?

मुंबई सोसायटीत माझ्या आईला कधीच पुजेला बोलवत नव्हते, माझी आई घरात एकटीच बसून असायची; असं म्हणताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चातुवर्ण व्यवस्थेवर बोट ठेवले. काही दिवसांपूर्वी राम मांसाहार करीत असल्याच्या वक्तव्यावरुन राज्यभरातून त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आव्हाडांचं वक्तव्य वादात सापडलं आहे. यावेळी आव्हाड म्हणाले, आजही वाईट वाटतं. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं, तटकरेंना गाडायचंय’, शरद पवार म्हणाल्याचा ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

गुहागर ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचंय, सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, त्याचमुळे त्यांनी ठाकरेंकडे माझ्या नावाची शिफारस केली, असा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्वसामान्यांना दिलासा – शरद पवार

मुंबई बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निकालाचे मी स्वागत करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात हा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच गुजरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

…तर शंकेला वाव, आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवारांचा आरोप

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरुन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हल्ला केला जात आहे. दरम्यान शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

शरद पवार यांनी घेतला ईशान्य मुंबईसह १० लोकसभा मतदारसंघाचा आढावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई ईशान्य, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्यामध्ये १८ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जागावाटपासाठी शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, लोकसभेच्या या 12 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही

मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या इंडिया आघाडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जागावाटपांबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचा शरद पवार गट […]