ताज्या बातम्या महाराष्ट्र

निवडणुकीपूरती “लाडकी बहीण योजना”; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

X : @therajkaran मुंबई – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा (CM Ladaki Baheen Yojana) लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे, आषाढी एकादशी 15 जुलै रोजी आहे. यासाठी पंधरा जुलैपर्यंत नोंदणीची अट रद्द करावी, सर्वांना ही योजना खुली असावी, अशी मागणी कॉंग्रेस सदस्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज विधानसभेत केली. चव्हाण […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

गाडीवर हल्ला करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप

सोलापूर – राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यात सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेमकं काय घडलंय? प्र्णिती शिंदे गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha Election : रामदास आठवलेंना दोन जागांची अपेक्षा, मंत्रिपद देण्याचीही मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी दोन जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.याशिवाय निवडणुकीनंतर पक्षाला मंत्रीपद देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा

X: @therajkaran मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत जागेवरून रस्सीखेच चालु आहे. या मतदारसंघावर (Madha LokSabha) आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil), शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr Babasaheb Deshmukh) यांच्यासह कार्यकत्यांनी सोमवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आठवलेंच्या लोकसभेच्या भूमिकेने महायुतीच्या अडचणीत वाढ; राज्यातील तीन मतदारसंघांतून निवडणूक लढण्याचा दावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मला पण अशा घरात…’, आवंढा गिळला अन् सोलापूरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक

सोलापूर आज सोलापूरातील कामगार वर्गासाठी हक्काचं घर मिळालं आहे. या गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांच्या लोकर्पणाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक झाले. यावेळी ते म्हणाले, मला पण लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले. पुढे ते म्हणाले, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आज मोदींनी एक गॅरेंटी पूर्ण केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘महाराष्ट्रावर प्रेम आहे म्हणून नाही…’; संजय राऊतांनी सांगितलं मोदींचं वारंवार राज्यात येण्याचं कारण

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात आज दुसऱ्यांदा महाराष्ट्रात आले आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक येथे युवा महोत्सव आणि अटल सेतूचं लोकर्पण केलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान सोलापूर येथे आले आहेत. सोलापूर गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे नेते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ड्रग्जसाठा प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंडचा शोध घ्या – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई  महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार (BJP government) करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा असून या प्रकरणातील खऱ्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई भाजपकडून “शंकेखोराचा कोथळा काढण्याचा” कार्यक्रम

Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानांचा वध करताना वापरलेल्या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.  […]