सोलापूर
आज सोलापूरातील कामगार वर्गासाठी हक्काचं घर मिळालं आहे. या गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांच्या लोकर्पणाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावुक झाले. यावेळी ते म्हणाले, मला पण लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले. पुढे ते म्हणाले, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आज मोदींनी एक गॅरेंटी पूर्ण केली आहे, मोदींची गॅरेंटी म्हणजे गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी.
मराठीत भाषणाला सुरुवात…
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी ते म्हणाले, पंढरपूरच्या विठ्ठलाला आणि सिद्धेश्वर महाराजांना मी नमन करत आहे.
सोलापूरातील कामगारांना आता पक्क्या घरात राहता येणार आहे. सोलापूरात मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वत:च्या हक्काचं घर मिळालं आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापूरातील रे नगर येथे साकारत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरातील कामगार वसाहतीचं लोकर्पण करण्यात आलं. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनीच या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं.
कशी आहे ही वसाहत?
३५० एकर परिसरात, ८३४ इमारती, ३० हजार फ्लॅट्स ही या देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर पाच वर्षांनी मोदींनी सोलापूरात येऊन याचं लोकार्पण केलं. ४ वर्षे तब्बल १० हजार कामगारांनी मिळून ही वसाहत उभारली.
“माझी आनंद वाढणार की नाही. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं.”, असं मोदी म्हणाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला.