महाराष्ट्र ताज्या बातम्या

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : पणनमंत्री जयकुमार रावल

X: @NalawadeAnnat मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा : कृषीमंत्री धनंजय मुंडे 

X: @therajkaran मुंबई: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश आजच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रालयात आज राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रविकांत तुपकर आक्रमक, शेतकऱ्यांच्या ताफ्यासह विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा

नागपूर सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनावर मोर्चा पुकारला आहे. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर जवळ उभे राहून त्यांनी ताफ्यासह आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथे पोलिसांकडून अडवण्यात आलं. सह्याद्रीवर पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नसल्याचा आरोप तुपकरांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकप्रतिनिधींना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे, रविकांत तुपकर संतापले

मुंबई सोयाबीन-कापसाच्या भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं म्हणज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. सभागृहात सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आमदार-खासदारांनी भांडून रान उठवलं पाहिले, रस्त्यावर उतरूनही नेते मंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तुपकरांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं आहे. तुपकरांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्ल्ड बँकेकडील अर्थसहाय्यासाठी मराठवाडा – विदर्भासाठी नियम शिथिल – धनंजय मुंडे

Twitter : @NalavadeAnant मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावी, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध केल्यास सभासदाची हकालपट्टी !

अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमधील (Maharashtra Apartment Ownership Act) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decisions) घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]