ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करा, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे पत्र लिहून मागणी

मुंबई राज्यातील नगरपरिषदातील संपूर्ण रिक्त पदे भरली पाहिजेत. परंतू सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय करत आहे. सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘खासगी कंपन्यांना नफा मिळवून देणारा उद्योग बंद करा’, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई सारथी, बार्टी, महाज्योतीच्या पीएचडी फेलोशीपच्या प्रवेश परीक्षेत सीलबंद पेपर न दिल्याने पुणे आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि पेपरफुटीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. यानंतर राज्यभरातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीची प्रकरणं पाहता विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. यावर विरोधकांनीही चौकशीची मागणी केली आहे. विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

PHD फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का? वडेट्टीवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल

पुणे सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांच्या पीएचडी फेलोशीप मिळवण्यासाठी आज १० जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत पुण्यातील वडगाव, नागपूर येथील केंद्रांवर सील पॅक केलेली प्रश्नपत्रिका न देता फोटोकॉपी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाण साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारले होते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व मराठवाड्यासाठी वैधानिक विकास महामंडळ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचं काम, नव्या मोटार वाहन कायद्याचा वडेट्टीवारांकडून निषेध

नवी दिल्ली केंद्र सरकारने आणलेला प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहन चालकांसाठीचा हा कायदा अत्यंत कठोर व जुलमी असल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख लोकशाहीसाठी घातक; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मुंबई जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असल्याची खरमरीत टीका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘है तैयार हम ‘ 28 डिसेंबरच्या महारॅलीसाठी नागपूरची ऐतिहासिक भूमी सज्ज

नागपूर देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून ‘ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली : विजय वड्डेटीवार 

X : @NalavadeAnant नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोना काळात (corona pandemic) तारले होते. मात्र, विद्यमान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विरोधकांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध आंदोलन

नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी विविध विषयांवरुन संताप व्यक्त केला. संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाज, ओबीसी समाज… जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अनुसूचीत जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस केंद्राकडून विलंब झाल्यास राज्यसरकार विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार का ?

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल नागपूर राज्यातील अभियांत्रिकी, औषधी निर्माण शास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवस्थापन आणि आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचीत जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे येण्यास केंद्राकडून विलंब होत आहे. त्यामुळे राज्यसरकार विद्यार्थ्यांना (Scholarship for Scheduled Caste Students) वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने […]