मुंबई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhajinagar) ठाकरेंनी भाजप (Bharatiya Janata Party) विरोधात मोठी खेळली आहे .भाजपचे तब्बल16 माजी नगरसेवक लवकरच उद्धव ठाकरे (uddhav thackeray shivsena) यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन हाती बांधणार आहेत. उद्धव ठकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांची अडचण वाढणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सध्या संजय शिरसाठ विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात असणारी ही जागा महायुतीत भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाचे नेते तथा संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात (Uddhav Thackeray) प्रवेश करण्याचा निश्चिय केला आहे. लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान येणाऱ्या सात जुलैला या भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का बसणार आहे . आगामी विधानसभेच्या पार्शभूमीवर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चाना उधाण आहे .
या प्रवेशावर राजू शिंदे यांनी भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे असे म्हणत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे असे त्यांनी म्हटले आहे .दरम्यान पुण्यातील माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते वसंत मोरे (Vasant More) यांनीही मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची(Uddhav Thackeray) भेट घेतली असून पुढील आठवड्यात नऊ जुलैला वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे