मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena)कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal )यांचं आज अल्पशाः आजाराने निधन झालं आहे ..मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत .
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील अनेक आक्रमक आंदोलनांचे नेतृत्व पांडुरंग सकपाळ यांनी केलं होतं. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरसुद्धा पांडुरंग सपकाळ हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत राहिले. पक्षाच्या पडत्या काळात दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे तब्बल 12 वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक १२ च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी होती. मात्र, 2023 साली उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. तसेच 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती.
दक्षिण मुंबईतील आक्रमक चेहरा म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख आहे. अनेक, आंदोलन त्यांनी गाजवली आहेत. महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी जोरदार टीका भाजपने करायला सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या निधनाने ठाकरे गटाला धक्का बसला आहे .