Twitter: @NalavadeAnant
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणावरून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी बुधवारी सकाळी साडे दहा,अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकल्याने आज नेहमीपेक्षा जास्त आलेल्या अभ्यांगतांचे प्रचंड हाल झाले.
सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी मंत्रालयाचे सर्व दरवाजे काही काळ बंद तर केलेच पण प्रवेश पास देणेही बंद केल्याने मंत्रालयाच्या बाहेर जमलेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण आणताना उपस्थित पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. काहींना तर अभ्यांगतांच्या संतप्त रोषालाही बळी पडावे लागले.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदाच सर्व पक्षीय आमदारांनी थेट मंत्रालयात येऊन टाळे ठोकण्याचा प्रकार केल्याने काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व संताप आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. एका अधिकाऱ्याने तर नाव न छापण्याच्या अटीवर बोलतांना संतप्त पणें बोलताना सत्ताधारी राजकीय नेत्यांवर प्रखर शब्दात आसूडही ओढले. सदर अधिकारी हा नामांकित संघटनेचा प्रमुख पदाधिकारीही कधी काळी होता.
आजच्या प्रकाराबद्दल विचारले असता तो उसळून संतापाने म्हणाला की, माझी हयात या मंत्रालयात गेली. माझ्या उभ्या आयुष्यात मंत्रालयात आमदारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांनी जी दादागिरी केली ती खर तर चीड आणणारी होती. त्यातही अतिरीक्त पोलिस आयुक्त व सध्या सूरक्षा विभागाचा अतिरीक्त पदभार असलेले एस पी मीना यांनी प्रामुख्याने ज्याप्रकारे मंत्रालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जी दादागिरी केली ती खपऊन न घेण्यासारखी व संताप आणणारी तर होतीच पण जशी काय महाराष्ट्रात जणू आणीबाणीच लावण्यात आली आहे इतके संतापजनक वर्तन या अधिकाऱ्याने केले. अहो मंत्रालयात जे पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करतात त्यांना एखाद्या हुकुमशाहा सारख्या धमक्या हा अधिकारी उघडपणे देत होता. कोणाच्या इशाऱ्याने म्हणा की वरदहस्ताने तो अशी वर्तणूक करत होता याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी यासर्व प्रकाराची तातडीने चौकशी करावी व दोषी आढळल्यास याला निलंबित करावे अशी माझी खुली मागणी असल्याचा संताप यांनी व्यक्त केला.
असल्या अधिकाऱ्यानं मुळेच पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते व सर्व दलाला एकसारखी फुटपट्टी लावली जाते हे खरं तरं पोलिस दलाचेच दुर्दैव आहे हे सांगण्यासही हा अधिकारी विसरला नाही. जी प्रतिक्रीया या अधिकाऱ्याची तशीच संतप्त प्रतिक्रिया एका सुशिक्षीत युवकाची. तो म्हणाला मी परदेशी जाऊन शिक्षणं घेऊ इच्छितो. मला एका देशाची शिष्यवृत्तीही मंजूर झाली. मी पुण्याला राहतो. त्यासाठी मंत्रालयात एक स्वतंत्र विभाग चौथा मजल्यावर आहे. गेली वीस दिवस मी मंत्रालयात त्याचे छायांकीत शिक्का घेण्यासाठी रोज मुंबई पुणे अप डाऊन करीत आहेत. आज माझा नंबर लागला. मी नेहमी साधारण तीन वाजेपर्यंत त्या विभागात हजर व्हायचो. पण या आमदारांनी काही तरी तमाशा केल्याने पोलिसांनी सकाळपासून दिले जाणारे प्रवेश पास बंद केले व आता दोन वाजता सुरू केले. आता तुम्हीच मला सांगा मला कधी पास मिळणार, कधी मी सुरक्षा यंत्रणेतून तपासणी करुन बाहेर पडणार, व कधी त्या विभागात पोहचून माझी कागदपत्रे घेणारं.
जशी या युवकाची संवेधनिक व बोलकी प्रतिक्रिया होती त्याच्या उलट बहुतांश अभ्यांगत सरकारच्या नावाने संतापाने बोटे मोडत, शाप देत आपला सर्व संताप उपस्थित पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अक्षरशः शिव्या शाप देत काढतं होते. पण खरंच या सर्वांना सेल्युट त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवत अतिशय शांतपणे परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला.