ताज्या बातम्या

पुणे अपघाताची सीबीआय चौकशी करा : काँग्रेसची मागणी

मुंबई

पुण्याच्या प्रकरणात (Pune incident) गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर आमचा विश्वास नसून पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI probe in Pune accident case) मार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.

राज्यात सध्या दुष्काळाचा (drought) प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या, पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी भाजपा सरकारचा (BJP government) सडकून समाचार घेतला. ते म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते. यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे, अशी मागणी करतानाच पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला, असाही गंभीर आरोप पटोले यांनी केला.

गुजरातमधून (Gujrat) मोठ्या प्रमाणात ड्रग्ज (drugs) महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्यानेच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी पटोले यांनी केला.

नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना १० तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील (Sassoon Hospital) डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. येथूनच ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावडे (Dr Tawade) यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिंमत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केल्याने पटोले यांनी नमूद केले.

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध..

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती (Manusmriti) आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात (inclusion of Manusmriti in syllabus) समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही पटोले यांनी यावेळी दिला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज