मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle loK Sabha) मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर आता उत्सुकता लागलीय ती निकालाची . या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून येत्या 4 जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे . कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावड्यात होणार आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम इमारत, राजाराम तलाव, कोल्हापूर याठिकाणी होणार आहे. तयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन घेतला आहे . त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गुलाल कोण उधळणार ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .
जिल्हा प्रशासनाकडून या मतमोजणीसाठी कसून तयारी केली असून कोल्हापूर लोकसभेला मतमोजणीसाठी 349, हातकणंगले मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे मिळून एकुण 986 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर अतिरिक्त 10 टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 600-600 पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत. कोल्हापूरच्या सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या आहे.चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. तर हातकणंगलेसाठी सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या आहे.शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21 तर शिरोळसाठी 24 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़ .. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन, आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आई आहे त्यामुळे आता येत्या ४ जूनला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati )आणि संजय मंडलिक (Sanjay Mandlik )यांच्यात थेट लढत होत आहे. हातकणंगलेत राजू शेट्टी (Raju Shetti), सत्यजित पाटील (Satyajeet Patil )आणि धैर्यशील मानें (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अंतिम चित्र 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.