महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे गटाचा नेता सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्तासोबतचे सबंध तपासणार: देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran

नागपूर: मुंबईतील मार्च १९९३ बाँबस्फोटातील पॅरोलवरील प्रमुख आरोपी सलीम कुत्तासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर याने केलेल्या पार्टी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. भाजप सदस्य नितेश राणे यांनी यासंदर्भात खळबळजनक आरोप सभागृहात केला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणकोण सहभागी आहेत याची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची घोषणा केली. याविषयीची माहिती देतांना आमदार नितेश राणे म्हणाले, मुंबई बाँबस्फोटात तेव्हा २५७ निरपराध लोकांचा मृत्यू तर ७०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता हा ‘पेरोल वर असतांना शेवटच्या दिवशी त्याने सुधाकर बडगुजर याच्यासमवेत पार्टी केली. याचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर उठलेल्या दाऊदच्या हस्तक समवेत पार्टी करणारे कोण? बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा यांना काय अधिकार आहे? बडगुजर याचा ‘गॉडफादर’ कोण ? तसेच तो कुणाच्या संपर्कात होता, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली. राणे यांनी संबंधित पार्टीचे छायाचित्रही सभागृहात दाखवले.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले, दाऊद देशाचा एक क्रमाकांचा शत्रू आहे. सलीम कुत्ता हा दाऊद याचा ‘शार्पशूटर’ आणि उजवा हात होता. शिवसेना भवन उडवण्याचा ही त्याचा कट होता. सुधाकर बडगुजर हा काही वर्षांत शेकडो कोटी रुपयांचा मालक झाला. देशद्रोही लोकांसमवेत पार्टी करणे गंभीर आहे. या प्रकरणाच्या खोलात जाऊन अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो याची चौकशी करावी अशी मागणी दादा भुसे यांनी केली.

Also Read: नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात