ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच , त्यांची औकातच नाही की तो एवढा…;” मिटकरींचा आरोप

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना बारामती (Baramati )लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार गट (Ajit Pawar Group )आणि शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यात चांगलीच वादाची ठिणगी पडली आहे . विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा पक्का निर्धार व्यक्त केला आहे. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही त्यांनी म्हटलं आहे .यावरून आता त्यांच्यावर अजित पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे . अजित पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari )यांनी शिवतारेंवर टीकास्त्र डागलं आहे.विजय शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेन… शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामती ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ. त्यावेळेस तो मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेसमोर आणू… काही गोष्टी गुलदस्तात ठेवा, असा इशाराच मिटकरींनी विजय शिवतारेंना दिला आहे.

काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच…, असा निर्धार केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची युती असतानाही शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी बोलताना शिवतारेवर हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , मला त्यांच्या तब्येतीची फार काळजी आहे… ते असं का वागत आहेत?. परिवारात वैफल्यग्रस्त असतो त्यावेळेस अशा प्रकारचे विधान होत असतात. त्यांनी निवडणूक लढवावी यावेळेस त्यांचा डिपॉझिट ही वाचणार नाही. अजितदादांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल तर तो घ्यावा…, असं मिटकरी म्हणालेत. दरम्यान लोकसभेच्या किती जागा मिळतील? आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल? हे बैठकीनंतरच समजेल. सातही मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे. महादेव जानकर बारामतीतून लढणार या चर्चेला काही अर्थ नाही. परभणीतून ते लढतील असं त्यांनी सांगितलं आहे. महादेव जानकर बारामतीमधून लढणार या सगळ्या अफवा आहेत , असं म्हणत राजकीय वर्तुळातील चर्चांवर मिटकरींनी भाष्य केलंय.

त्यानंतर मिटकरी यांनी बोलताना बारामतीत सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar )त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत. पण तिथलं वातावरण डिस्टर्ब व्हावं म्हणून आमच्यातलाच एक गट जो आहे तो अशा प्रकारच्या कंड्या पेरतोय. आमच्यातला गट म्हणजे तुतारी गट…, असं अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर जोरदार टीका केली आहे.आता घरातले सगळे संपले आता…वॉचमन, गेट किपर, गाय वासरू कुक हे सगळेच स्क्रीप्ट घेऊन आणतील… कितीही चक्रव्यूह आखला तरी बारामतीचा नागरिक अजित पवारांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही व्यक्त केला.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात