मुंबई – आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या खरेदीप्रकरणी प्रश्न विचारला होता.
उत्तर देताना मंत्री उईके म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शालेय गणवेश, पी.टी. ड्रेस आणि नाईट ड्रेस खरेदी करताना उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अभिप्रायाचा विचार करण्यात आला. यासाठी १०५.८४ कोटी रुपयांच्या खर्चास १५ मार्च २०२४ रोजी मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनुसार साहित्याचा पुरवठा करण्यात आला असून, चौकशीत कोणतीही अनियमितता आढळलेली नाही.