महाराष्ट्र ताज्या बातम्या

संगमेश्वर भूमाफिया प्रकरणात SDO निलंबित; कठोर कारवाईची घोषणा

मुंबई – संगमेश्वर (जि. नाशिक) येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी भूमाफियांविरोधात कडक कारवाई होणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात येत आहे. त्यांच्यावर महिन्याभरात विभागीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. बावनकुळे म्हणाले, सदर जमीन बिनशेती परवानगी, शासकीय मोजणी, व नजराणा न भरता विकली गेली. तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असतानाही १६ तुकडे करण्यात आले.

या प्रकरणात २५८ दस्त नोंद करण्यात आले असून, मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृतपणे दस्त नोंदणी केली. २०१३ पासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुकीच्या नोंदी केल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर विभागीय चौकशी करून कारवाई केली जाईल.

मालेगाव येथील स्टॅम्प वेंडर झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ व त्यांच्या साथीदारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनपूर्वी सभागृहास याबाबत माहिती देण्यात येईल.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात