पालघर: “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं! (Reservation is our Right not anyone’s Legacy)” — या घोषणांनी आज पालघर शहर दणाणून गेले. आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती (Adivasi Reservation Bachao Kriti Samiti) च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘जन आक्रोश विशाल मोर्चा (Palghar Adivasi Reservation Protest Rally)’ मध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधव सहभागी झाले.
या मोर्चाचे नेतृत्व समितीचे जिल्हा अध्यक्ष आमदार विलास तरे (MLA Vilas Tare) यांनी केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आदिवासी आरक्षणात (Adivasi Quota) कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क (Constitutional Right) आहे आणि तो कुणाच्याही बापाचाही वारसा नाही!”

आज (१४ ऑक्टोबर २०२५) सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक (Birsa Munda Chowk) येथे आदिवासी महिला, तरुण आणि विद्यार्थी मोर्चात जमू लागले. पारंपरिक वाद्यांच्या नादात आणि घोषणांच्या गजरात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला.
“बंजारा-धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ! (Remove Banjara Dhangar from ST List)”, “हम हमारा हक मांगते, किसीसे भिख नहीं मांगते!”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!”, “बिरसा मुंडा करें ऊलगुलान – ऊलगुलान!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. Kantara 2 चित्रपटातील सांस्कृतिक दृश्यांची छटा देखील मोर्चात दिसली.
मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड (Collector Indu Rani Jakhad) यांना निवेदन देण्यात आले. त्यात बंजारा (Banjara) आणि धनगर (Dhangar) समाजाला अनुसूचित जमातीत (ST Category) समाविष्ट करण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे — “हे पाऊल संविधानविरोधी (Constitutionally Invalid) आहे आणि आदिवासी समाजाच्या हक्कांवर आघात करणारे आहे.”

सभेत आमदार विलास तरे म्हणाले, “आदिवासी समाजाचा संघर्ष केवळ आरक्षणापुरता नाही, तर आपली ओळख (Identity), संस्कृती (Culture) आणि अस्तित्व (Existence) यासाठी आहे. ‘संविधानाचा सन्मान करा, आदिवासींचा अधिकार राखा!’ हेच या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
त्यांनी सरकारला सतर्क करत सांगितले — “जर गरज पडली तर आम्ही आमच्या जातीचा राजीनामादेखील देऊ (Tribal Leaders Ready to Resign).”
आदिवासी युवकांनी पारंपरिक पोशाखात (Cultural Dress) आणि झेंड्यांसह मोर्चात सहभाग घेतला. काही संघटनांनी सांस्कृतिक नृत्य (Cultural Dance Performance) सादर करत घोषणांद्वारे आंदोलनाला रंग दिल. “आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल (Save Culture to Save Reservation)” असा संदेश सभेतून दिल गेला.
सभेचा समारोप “जय जोहार! जय आदिवासी! (Jai Johar Jai Adivasi)” या घोषणांनी झाला. आंदोलन शांततेत पण निर्धारपूर्वक पार पडले.
या मोर्चात खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी खासदार बळीराम जाधव, वैदही वाढाण, जगदीश धोडी, रमेश सवरा, ॲड. विराज गडग, संतोष बुकले, अशोक शिंगाडा, प्रसाद पऱ्हाड, प्रतिभा गुरोडा, डॉ. सुनील पऱ्हाड, दत्ताराम करबट, किर्ती वरठा, ॲड. मीना धोदडे आदी नेते उपस्थित होते.
आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या प्रमुख मागण्या (Key Demands of Adivasi Reservation Committee)
1️⃣ बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये (No Inclusion of Banjara & Dhangar in ST Category).
2️⃣ आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणास विरोध (Stop Tribal Land Transfer).
3️⃣ बोगस आदिवासी जात वैधता प्रमाणपत्रे रद्द करा (Cancel Fake Tribal Caste Certificates).
4️⃣ पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी (PESA Law Implementation).
5️⃣ जिल्हा परिषदेच्या सभागृहाला निसर्गवासी काळुराम काकड्या धोदडे यांचे नाव देण्यात यावे (Name ZP Hall after Kaaluram Dhodade).