नवी दिल्ली
उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. आतापर्यंत सात ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीचे १० ते १२ अधिकारी वायकरांच्या घर दाखल झाले आहेत. सकाळी साडे आठ वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती, अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
रवींद्र वायकर हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्येही वायकर यांच्यावर छापे पडले होते. आता पुन्हा वायकरांना नोटीस दिली होती. वायकर यांनी आरक्षित असलेल्या भूखंडावर उभारलं हॉटेल, जोगेश्वरीच्या भूखंडावर क्रीडा विषयक प्रकल्प राबवण्याचा करार महापालिकेसोबत केला होता. मात्र त्यांनी या ठिकाणी हॉटेल उभारलं असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.