मुंबई
मे २०२३ मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आमदार अपात्रतेची केस दाखल केली होती. त्यावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीवरुन संताप व्यक्त केला. शिंदे-नार्वेकर यांच्या भेटीमागे मिलिभगत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
निकालापूर्वी न्यायाधीश आणि आरोपींची भेट बेकायदेशीर असते. दोन वेळा अशा भेटी झाल्या आहेत. यावरुव ठाकरेंनी राग व्यक्त केला. आपल्या देशात लोकशाही राहणार की नाही, हे उद्याच्या निकालावरुन स्पष्ट होईल. असंही ते पुढे म्हणाले, यावेळी अनिल देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला.
शिंदे गटाने नियुक्त केलेला प्रतोद हा बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. उद्या नार्वेकर गोगावलेंना बेकायदेशीर ठरवतात का, हे पाहायला हवं. उद्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पार पडेल अशी अपेक्षा देसाईंनी व्यक्त केली.