मुंबई
आज मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे. अनेकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही तर अनेकांना मिळणारं मानधन अत्यंत तुटपुंज्या स्वरुपातील आहे, असा आरोप अंगणवाडी सेविकांकडून केला जात आहे.
या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणा अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कधीही हक्काने बोलवा हा भाऊ तुमच्यासोबत असेल अशा शब्दात सेविकांना दिलासा दिला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे…
- आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. हल्ली क्रांतीज्योती, क्रांती सूर्य म्हणण्या इतकी मोठी माणसंच उरलेली नाहीत. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. ज्योत ही शांत असली तरी जेव्हा असंख्य ज्योती एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल होते.
- जेव्हा सेवा करणारे हात एकमेकांवर आपटले तर इतका आवाज येतो. जर हेच हात सरकारच्या कानाखाली आपटले तर किती आवाज येईल.
- मी मुख्यमंत्री झालो तेव्हा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करीत होतं. तेव्हा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सेवा करीत होत्या. पुढे आमचं सरकार पडलं, मात्र आमचं सरकार असतं तर तुम्हाला आंदोलनासाठी मुंबईत यावं लागलं नसतं.
- सरकारकडे जाहीरातीसाठी पैसे आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांसाठी नाही.
- आतपर्यंत मिळायला हवं होतं जे मिळालं नाही म्हणून तुम्हाला रस्त्यावर आलात, तु्म्ही भीक मागत नाही, तुम्ही हक्काचं मागताय.