महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेची अवस्था शोलेमधील असरानी सारखी !

  • मंत्री, मुंबई भाजपा अध्यक्ष अँड आशिष शेलार

मुंबई : उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधील असरानी सारखी होणार असून म्हणूनच आपण एकटे लढणार असे सांगत आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील दगाबाज नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे, अशा शब्दांत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी हल्लाबोल माध्यमांशी बोलताना केला.

उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेतील भाषणाचा आपल्या एक्स पोस्टवरुन समाचार घेताना अँड आशिष शेलार म्हणले की,
श्रीमान उध्दव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 चा आहे. त्यामुळे 1951 साली स्थापन झालेल्या जन संघाच्या विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही.

5 आणि 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळी श्रीमान उध्दव ठाकरे यांचे वय 20 वर्षे होते त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि “करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात” असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या श्रीमान उध्दव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता ? 100 वर्षे पुर्ण करणाऱ्या संघावर बोलता? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमितभाई शाह यांच्यावर बोलता ..? समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही . श्रीमान उद्धव ठाकरे तुम्ही अमिताभाई शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात ? कसले? केव्हा ? आधी तुम्ही तुमचे वडिल म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा 26 जुलैच्या पुरात अडकले होते.. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला “पाठ दाखवून” पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा.

कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा.

मग कळेल जखमा खोल आहेत.. की… तुमच्या मेंदूतच झोल आहे, अशा शब्दांत त्यांनी जोरदार पलटवार केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात