ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या कोणत्या 12 जागांवर दावा?

मुंबई

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. आता त्यांनी जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांना एक फॉर्म्युला दिला आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात. उर्वरित 12 जागा वंचित लढवेल, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला. आंबेडकरांनी समसमान वाटपाचा लेटरबॉम्ब टाकला. त्यानंतर आघाडीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४७ जागा लढवल्या होत्या. तर औरंगाबादची १ जागा एमआयएमसोबत एकत्रितपणे लढवली होती. गेल्या निवडणुकीत वंचित सर्व जागा हरल्या असल्या तरी त्या परिणामकारक ठरल्या. त्यांनी सर्वसामान्यांना उमेदवारी दिली आणि काही ठिकाणी दुसऱ्या तर काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी एकूण ४१ लाख मतं घेतली. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत वंचितचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येत आहे.

आता त्या कोणत्या १२ जागा असतील ज्यावर प्रकाश आंबेडकर दावा करू शकतात. जाणून घेऊया…

१ सोलापूर लोकसभा – SC राखीव
हा मतदारसंघ एससीसाठी राखीव असून २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सिद्धेश्वर महाराज ५ लाख २५ हजार मतांनी विजयी झाले होते. तर सुशीलकुमार शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची ३ लाख ६६ हजार मतं आणि प्रकाश आंबेडकरांना १ लाख ७० हजार मतं मिळाली होती. वंचित काँग्रेससोबत लढली असती तर सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला नसता.
एससी मतदार – १६ टक्क्यांच्या आसपास
एसटी मतदार – ३ टक्के
मुस्लीम – १२ टक्के

२ सांगली मतदारसंघ
या मतदारसंघात २०१९ मध्ये वंचितकडून गोपीचंद पडळकर लढले होते, आणि त्यांना ३ लाख मतं मिळाली होती. तर भाजपचे संजय काका पाटील यांना ५ लाख ९ हजार मतं मिळून विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर आघाडीकडून स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील यांना ३ लाख ४४ मतं मिळाली होती. त्यामुळे वंचित या जागेची मागणी करू शकते.
एससी मतदार – जवळपास १४ टक्के
मुस्लीम मतदार – ७.५ टक्के
एसटी मतदार – १ टक्के

३ हिंगोली मतदारसंघ –
२०१९ मध्ये या जागेवर शिवसेनेचे हेमंत पाटील ५ लाख ८६ हजार मतांनी विजयी झाली हेते. वंचितचे मोहन राठोड यांना १ लाख ७५, काँग्रेसचे सुभाष वानखडेंना ३ लाख ८ हजार मत मिळाली होती. एससी मतदार – १५ टक्के
एसटी मतदार – १३ टक्के
मुस्लीम मतदार – ८ टक्के

४ बुलढाणा मतदारसंघ
२०१९ च्या लोकसभेत शिवसेनेचे प्रतापराव जाधव ५ लाख २२ हजार मतांनी विजयी झाले होते. राष्ट्रवादी डॉ. शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार, वंचितचे बळीराम शिळसकर १ लाख ७२ हजार मतं मिळाली होती. राष्ट्रवादी आणि वंचित एकत्र लढले असते तर विजय मिळवता आलं असतं.
एससी मतदार – १९ टक्के
एसटी मतदार – ५ टक्के
मुस्लीम मतदार – १२ टक्के

५ नांदेड मतदारसंघ
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांना ४ लाख ४७ मतं तर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकरांचा ४ लाख ८७ मतांनी विजय झाला होता. या मतदारसंघात वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला. येथून यशपाल धिंग्रे यांना १ लाख ६६ हजार मतं मिळाली होती.
एससी मतदार – २० टक्के
एसटी मतदार – ६ टक्के
मुस्लीम मतदार – १४ टक्के

६ परभणी मतदारसंघ
२०१९ लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे बंडू जाधव खासदार राहिले होते. त्यांना त्यावेळी ५ लाख ३९ हजार मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे राजेश वेटेकर यांना ४ लाख ९७ हजार मतं तर वंचितचे आलमगीर खान यांना १ लाख ५० हजार मतं मिळाली होती. राजेश वेटेकर सध्या अजित पवार गटात असल्याने त्यांनाही या मतदारसंघात महायुतीतून उभं करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.
एससी मतदार – १४ टक्के
एसटी मतदार – २ टक्के
मुस्लीम मतदार – १२ टक्के

७ हातकणंगले मतदारसंघ
शिवसेना – धैर्यशील माने – ५ लाख ८६ हजार
स्वाभिमानी – राजू शेट्टी – ४ लाख ९० हजार
वंचित -अस्लम सय्यद-१ लाख २३ हजार
एससी मतदार – १३ टक्के
एसटी मतदार – १ टक्के
मुस्लीम मतदार – ७ टक्के

८ लातूर – एससीसाठी राखीव
भाजप – सुधाकर श्रृंगारे – ६ लाख ६१ हजार
काँग्रेस – मछिंद्र कामन – ३ लाख ७२ हजार
राम गारकर – वंचित -१ लाख १२ हजार
एससी मतदार – २० टक्के
एसटी मतदार – २ टक्के
मुस्लीम मतदार – १२ टक्के

९ अमरावती – एससी राखीव
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा (अपक्ष) काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा मिळाला होता आणि त्या तेथून विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना हरवलं होतं. तर येथून वंचितच्या उमेदवारा ६५ हजार मतं मिळाली होती.
एससी मतदार – १९ टक्के
एसटी मतदार – १४ टक्के
मुस्लीम मतदार – १९ टक्के

१० गडचिरोली-चिमुर मतदारसंघ – एसटी राखीव
भाजप – अशोकराव नेते – ५ लाख २० हजार
काँग्रेस – नावदेवराव उसंडी – ४ लाख ४२ हजार
वंचित – रमेशकुमार गसबे – १ लाख ११ हजार
एससी मतदार – ३० टक्के
एसटी मतदार – १२ टक्के
मुस्लीम मतदार – २.५ टक्के

११ छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ
एमआयएम – इम्तियाज जलील – ३ लाख ८९ हजार
शिवसेना – चंद्रकांत खैरे – ३ लाख ८४ हजार
अपक्ष – हर्षवर्धन जाधव – २ लाख ८३ हजार
एससी मतदार – १६ टक्के
एसटी मतदार – २ टक्के
मुस्लीम मतदार – २२ टक्के

१२ अकोला लोकसभा
२०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडरांनी अकोल्यातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना २ लाख ७८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी त्यांना २५ टक्के मतदान झालं होतं.
भाजप – संजय धोत्रे – ५ लाख ५४ हजार मतं मिळाली होती.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात