मुंबई : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेता आणि माजी खासदार संजय निरूपम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. यानंतर काँग्रेसचे नेते गप्प असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या निरुपमांच्या समर्थनासाठी मैदानात उतरल्या आहेत.
‘मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात हे नमूद करू इच्छिते की, महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे, निर्णय अद्याप झालेला नाही.’; असं वर्षा गायकवाडांनी एक्सवर लिहिलं आहे.
काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबई उत्तर-पश्चिम जागा त्यापैकी एक आहे. शिवसेना उद्धव गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर निवडणूक लढू इच्छिते, मात्र काँग्रेसकडून तीन-तीन जागांच्या वाटपाची मागणी करीत आहे.
काँग्रेसकडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून संजय निरूपम हे तगडे उमेदवार आहेत. मात्र शनिवारी उद्धव यांनी एकतर्फी निर्णय घेत या जागेवर आपल्या पक्षाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर संजय अस्वस्थ असल्याचं समोर आहे. परिणामी त्यांनी सोशल मीडियावरुन आपली अस्वस्थता व्यक्त केली.
संजय निरुपमांचं ट्विट…
‘काल संध्याकाळी उर्वरित शिवसेना प्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. रात्रीपासून फोन येत आहेत. हे कसं शक्य होईल? महाविकासच्या अनेक बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी एक आहे. असं जागावाटपात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांची माहिती आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचं उल्लंघन नाही का? की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा. शिवसेनेने कोणाचे नाव सुचवले आहे? तो खिचडी स्कॅम घोटाळेबाज आहे. त्यांनी खिचडी सप्लायरकडून चेकमधून लाच घेतली. खिचडी घोटाळा हा कोविडमध्ये मदूर प्रवाशांना बीएमसीकडून मोफत भोजन उपलब्ध करण्याचा कार्यक्रम होता. गरीबांना अन्न देण्याच्या योजनेत शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवाराने लाच घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केल्याने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे इच्छुक उमेदवार संजय निरुपम संतप्त झाले आहेत. त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन कीर्तिकर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला.