महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

भ्रष्ट आणि निलंबित क्रीडा अधिकाऱ्यांना कोण वाचवतेय?

X: @vivekbhavsar

नागपूर: राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे मंत्री शोधून काढतील का? असा प्रश्न या विभागातील अन्य काही अधिकारी उपस्थित करत आहेत.

सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) सुरू आहे. यादरम्यान क्रीडा विभागातील काही अधिकाऱ्यांनी राजकारण शी (TheRajkaran) संपर्क साधून चार अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. जळगावचे (Jalgaon) जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक, भंडारा (Bhandara) जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंडे (निलंबित) यांच्यासह अमरावती (Amaravati) विभागाचे क्रीडा विभागीय उपसंचालक विजय संतन यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या (corruption charges) आरोपावरून विभागांतर्गत चौकशी सुरू आहे.

या चौघांपैकी कविता नावंडे यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे तर अन्य तिघांची चौकशी अजूनही सुरू आहे. देशभरात कोरोनाची लाट (corona pandemic) असताना घनश्याम राठोड यांनी जमीन समतल करण्याच्या कामाचा ठेका मर्जीतील व्यक्तीला दिला होता. देशभरात सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कुठलेही काम होत नसताना राठोड यांनी त्यांच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला (contractor) काम देऊन प्रत्यक्षात कुठलेही काम न करता निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

रवी नाईक यांनी देखील चुकीच्या पद्धतीने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला ऑर्डर काढून गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर कविता नावंडे यांच्यावर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप असून शासकीय कामात गैरव्यवहार, आपल्या मर्जीतील पुरवठादारला काम देणे, तसेच भ्रष्टाचारचे गंभीर आरोप आहेत.

या सर्व अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी (DE) सुरू असताना मंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकारी पातळीवर ही चौकशी दाबण्याचा आणि या अधिकाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप क्रीडा खात्यातीलच (sports department) अन्य अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मंत्री संजय बनसोडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि मधल्या मध्ये सरकारी कामात हस्तक्षेप करून दोषी अधिकाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Also Read: निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात