मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . यासाठी सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत . आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसडून विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) उमेदवारांमध्ये शिवाजीराव गर्जे (shivajirao Garje) आणि राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडकीसाठी हे दोघे उमदेवारी अर्ज मंगळवारी भरण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेल्या 50 जणांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली . यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. यामध्ये संजय सावंत, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता. यापैकी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ठाकरे गटाने ११ व्या जागेवर विनायक राऊत याना रिंगणात उतरवल्यास चुरस निर्माण होऊ शकते.सध्या शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात.तर राजेश विटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना, ‘विधानपरिषदेवर संधी देऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राजेश विटेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळू शकते.
विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे (mahayuti )आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे (MVA) 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. केवळ 11 व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील उत्सुक आहेत . त्यामुळे ते आता विधानपरिषदेवर निवडनू येऊ शकतात