महाड : महाड तालुक्यातील प्रसिद्ध वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना वीरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी त्यांची लाडकी बहीण झोलाई माता विन्हेरे गावातून मोठ्या थाटामाटात प्रस्थान करत आहे.
महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी महाडसह परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या महाडमध्ये दाखल होत आहेत. मात्र वीरेश्वर महाराजांची मोठी बहीण असलेली झोलाई माता ही महाडच्या छबिनाला गेल्याशिवाय महाडचा छबिना पूर्ण होत नाही, अशी ऐतिहासिक कथा आहे. या छबिना उत्सवासाठी विन्हेरे गावातून हजारो भावी सकाळपासून झोलाई मातेच्या देवस्थानापाशी जमा झाले आहेत. पालखीची सजावट माने यांच्या अंगणात पूर्ण झाल्यानंतर व पहिली ओटी माने यांच्याकडून अर्पण झाल्यानंतर बोलाई देवी महाडच्या छबिनासाठी प्रस्थान करते.
महाड ते विन्हेरे हे वीस किलोमीटर अंतर हजारो भाविक तळपत्या उन्हात पायी चालत असतात. यामध्ये लहान मुले, मुली, वृद्ध व पालखीचे मानकरी, खांदेकरी यासह असंख्य भाविक महाडच्या यात्रेसाठी विन्हेरे गावातून गावातून पालखी बरोबर प्रस्थान करीत असतात. झोलाई देवीची पालखी निघाल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर अंतरापर्यंत तिचे प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या जल्लोषात स्वागत करतात. यावेळी तिची ओटी भरण्यासाठी अक्षरशः मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग सामील झालेले असतात.
याचबरोबर सोलाई देवीची मानाची शासनकाठी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावातील भक्त आपल्या खांद्यावर काठी घेऊन २० किलोमीटर अंतर पायी चालत असतात. महाड पर्यंतचा झोलाई देवीचा हा प्रवास मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होत असतो. या उत्सवासाठी दरवर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.