By Supriya Gadiwan
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून महायुती सरकार सत्तेत आले. या महायुती सरकारकडून आता राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनावर घट्ट पकड बसवण्यासाठी मोठा निर्णय घेत महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. तेरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या असून उत्तम प्रशासकीय कारकीर्द असलेल्या मनोज कुमार शर्मा यांच्याकडे विशेष पोलिस महानिरीक्षक या पदाची जबाबदारी सोपवली आहे.
महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसले होते, मात्र फडणवीस यांनी गृहखाते आपल्याकडेच ठेवले. त्यानंतर आता नव्या वर्षात राज्य सरकारकडून सहा पेक्षा अधिक वेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यानुसार गृह खात्याने याबाबतचा आदेश काढत महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी मनोज कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ते जाणून घेऊया.
1. मनोज कुमार शर्मा - विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
2. आर. बी. डहाळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
3. शोक मोराळे - विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
4. राजीव जैन - विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल
5. निखील गुप्ता - अपर पोलीस महासंचालक, कायदा आणि सुव्यवस्था
6. सुरेश मेखला - अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
7. यशस्वी यादव - अपर पोलीस महासंचालक, सायबर सेल
8. सुहास वारके - अपर पोलीस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
9. अश्वती दोर्जे - अपर पोलीस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग
10. छेरिंग दोर्जे - अपर पोलीस महासंचालक, विशेष अभियान
11. के. एम. मल्लिकार्जुन - अपर पोलीस महासंचालक, प्रशासन
12. अभिषेक त्रिमुखे - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
13. श्रेणिक लोढा - अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा
हे बदल प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आले आहेत.
- मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
- आर बी डहाळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
- अशोक मोराळे – विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
- राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल
- निखील गुप्ता – अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था
- सूरेश मेखला – अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
- यशस्वी यादव – अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल
- सुहास वारके – अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
- अश्वती दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग
- छेरिंग दोर्जे – अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान
- के एम मल्लिकार्जुन – अपर पोलिस महासंचालक, प्रशासन
- अभिषेक त्रिमुखे – अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
- श्रेणिक लोढा – अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा
हे बदल प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आले आहेत.