मुंबई : छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) मतदारसंघातील शिवसेनेचा पराभव होण्यास कारणीभूत ठरलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा (Harshvardhan Jadhav ) अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे .जाधवांच्या एन्ट्रीमुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे यंदाही ही निवडणूक रंगतदार होणार असलयाचे दिसून येत आहे .
मराठवाड्याची (Marathwada) राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून अपेक्षेप्रमाणे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी देण्यात आली आहे . मात्र आता त्यांच्याविरोधात हर्षवर्धन जाधव यांनी मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुढी उभारून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मत घेतल्याने चंद्रकांत खैरेंना (Chandrakant Khaire) पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच जाधव यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने मागची पुनरावृत्ती होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार संभाजीनगरमधून (Sambhajinagar) आघाडीचे उमेदवार हे चंद्रकांत खैरे आहेत . मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अंबादास दानवे यांचा पत्ता कट झाला आहे