महाराष्ट्र

कोल्हापूर लोकसभेतून चेतन नरकेंची अखेर माघार

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha )मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून गौकुळचे संचालक ,डॉ . चेतन अरुण नरके( Chetan Arun Narake​ )यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला होता. तसेच या मतदारसंघातून ते अपक्ष लढणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता . आता स्वतः चेतन नरके यांनीच कोल्हापूरच्या आखाड्यातून माघार घेतली आहे . त्यामुळे या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे .

आज गोकुळचे संचालक नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे .ते म्हणले , सामान्य जनता माझा पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हिजन घेऊन मी लोकसभेच्या रिंगणात राहणार असल्याची घोषणा केली होती. आजही आपली इच्छा आहे. मात्र पक्षीय ताकद महत्वाची आहे. 7 मे रोजी मतदान होईल. पण 8 मे पासून पुन्हा मी मैदानात, राजकारणात मी सक्रिय असेन, असेही नरके यांनी स्पष्ट केले आहे .निवडणुकीतून माघारी घेत असताना त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवलं नसले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाईल असेही नरके यांनी सांगितले आहे. सुरेश भट यांची कविता म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे .

गेल्या पंधरा दिवसात नरके यांच्याकडे महाविकास आणि महायुतीतील काही नेत्यांनी संपर्क केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil ), माजी आमदार मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) यांनी देखील नरके यांची दोन वेळा भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील नरके यांच्याशी संपर्क साधला आहे.त्यामुळे चेतन नरके माघारीनंतर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे दरम्यान या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्याविरोधात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) हे निवडणूक लढवत आहेत . त्यामुळे या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात