मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha )मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून गौकुळचे संचालक ,डॉ . चेतन अरुण नरके( Chetan Arun Narake )यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला होता. तसेच या मतदारसंघातून ते अपक्ष लढणार असल्याच्या चर्चाना जोर आला होता . आता स्वतः चेतन नरके यांनीच कोल्हापूरच्या आखाड्यातून माघार घेतली आहे . त्यामुळे या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे .
आज गोकुळचे संचालक नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे .ते म्हणले , सामान्य जनता माझा पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हिजन घेऊन मी लोकसभेच्या रिंगणात राहणार असल्याची घोषणा केली होती. आजही आपली इच्छा आहे. मात्र पक्षीय ताकद महत्वाची आहे. 7 मे रोजी मतदान होईल. पण 8 मे पासून पुन्हा मी मैदानात, राजकारणात मी सक्रिय असेन, असेही नरके यांनी स्पष्ट केले आहे .निवडणुकीतून माघारी घेत असताना त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवलं नसले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाईल असेही नरके यांनी सांगितले आहे. सुरेश भट यांची कविता म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे .
गेल्या पंधरा दिवसात नरके यांच्याकडे महाविकास आणि महायुतीतील काही नेत्यांनी संपर्क केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil ), माजी आमदार मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) यांनी देखील नरके यांची दोन वेळा भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील नरके यांच्याशी संपर्क साधला आहे.त्यामुळे चेतन नरके माघारीनंतर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे दरम्यान या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्याविरोधात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) हे निवडणूक लढवत आहेत . त्यामुळे या मतदारसंघात कोणाची बाजी लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .