राष्ट्रीय

मविआ म्हणजे मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट : स्मृती इराणी

गेल्या अडीच वर्षात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. त्यातही सर्व समाजातील घटकांचा विकास आणि महिला सन्मान हेच भाजपचे ध्येय आहे. त्यानुसारच विकासाची कामे गतीने होत असून विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीलाच आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

एकीकडे विकासाला गती देणारी महायुती तर दुसरीकडे ‘मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट’ अशी नीती असणारी महाविकास आघाडी आहे, अशी सडकून टीकाही श्रीमती इराणी यांनी यावेळी केली.

श्रीमती इराणी म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अन्य राज्यातील काँग्रेसचे नेते आता महाराष्ट्रात खोटारडेपणाचे मायाजाल पसरवायला आले आहेत. कर्नाटकात आताची दिवाळखोरीची स्थिती पाहता निवडणूक काळात काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे राज्याची तिजोरी खाली झाली हेच सिद्ध झालेले असून दिवाळखोरीच्या मार्गावर आणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आदिवासी आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी राज्याच्या तिजोरीतील सुमारे दहा हजार कोटींचा निधी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी इतरत्र वळवला, असा गंभीर आरोप करतानाच, जे राजस्थानात जनतेला भुरळ घालून मते मिळवण्यासाठी काँग्रेसने बेरोजगारांना भत्ता देण्याचे जाहीर केले. मात्र तेथे बेरोजगारांना कोणताही भत्ता अजूनही मिळालेला नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर आरोपांचा निशानाही साधला.

जे नेते हरियाणाच्या निवडणुकीत जिलेबीची फॅक्टरी उघडण्यासाठी इच्छुक होते त्यांना हरियाणाच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे. पण जे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आले त्यांनी हिमाचलच्या जनतेला वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र तिथे बिले वाढवली. प्रत्येक महिलेला दरमहा १५०० रुपये देण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले होते. पण प्रत्यक्षात ९६ टक्के महिलांना त्यापासून त्यांनी वंचित ठेवले. मते मिळवण्यासाठी काँग्रेस निवडणुकीच्या काळात खोटे बोलते, नंतर लूट करते आणि देशात फूट पाडते हे कळून चुकल्याने महाराष्ट्रतील जनता या खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असा सणसणीत इशाराही इराणी यांनी यावेळी बोलताना दिला.

मोदी सरकारने सर्वांसाठी जनकल्याणाच्या योजना राबवल्या, सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला खरा मात्र केवळ जातीजातींमध्ये फूट पाडणा-याना मत हवे, विकास नको अशी नीती असणा-या विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असाही इशारा त्यांनी शेवटीं दिला.

Avatar

Meenal Gangurde

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे