महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटीत लवकरच नोकरभरती : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा महत्त्वाची, पण पुढे काय…?

मुंबई : एसटी महामंडळाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी लवकरच २५ हजार स्वमालकीच्या नव्या बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या बस चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार असून, चालक, वाहक तसेच विविध अन्य संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली.

सरनाईक म्हणाले की, “एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने २०२४ पर्यंत नोकरभरतीला मनाई केली होती. मात्र, आता हजारोंच्या संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहेत, तसेच नव्या बसगाड्यांची तातडीने गरज असल्याने चालक-वाहकांसह विविध पदांची भरती अनिवार्य ठरणार आहे. याबाबतचा ठराव एसटीच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत संमत झाला असून, तो लवकरच शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.”

अभियंत्यांच्या रिक्त जागाही भरणार

एसटी महामंडळाच्या विविध विभागांमध्ये सध्या कुशल अभियंत्यांची व शिक्षण अधिकाऱ्यांची कमतरता आहे. खासकरून, भविष्यात पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्वावर विकसित होणाऱ्या प्रकल्पांसाठी बांधकाम विभागात तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंत्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या पदांसाठी करार पद्धतीने व सरळसेवा भरतीद्वारे निवड केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

विभागनिहाय रिक्त पदांचा फेर आढावा

नवीन नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन, कोणत्या संवर्गातील पदांची भरती आवश्यक आहे, याबाबत एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

“एसटी महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी केवळ मनुष्यबळ नव्हे, तर तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि सक्षम अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. ही गरज ओळखूनच भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात