मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail projects) वेळेत पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करण्यास सांगण्यात आले. मेट्रोच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प (Housing projects) उभारण्याचे आणि निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देशही दिले. प्रत्येक प्रकल्पाची माहिती सीएम डॅशबोर्डवर अद्ययावत ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
वरळी बीडीडी चाळीतील (Worli BDD chawl) रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप होणार असून नायगाव आणि एन.एम. जोशी मार्ग चाळीतील घरे ठरलेल्या वेळेत देण्यात येतील.
बैठकीत बीडीडी चाळ पुनर्विकास, मुंबईतील मेट्रो लाईन्स २बी, ४, ५, ६, ७ए, ९, पुणे मेट्रो (Pune Metro), विविध जोड बोगदे, सी लिंक प्रकल्प (Sea Link Projects), रिंगरोड, मल्टिमोडल कॉरिडॉर, धारावी पुनर्विकास (Dharavi Redevelopment), जालना-नांदेड महामार्ग (Jalna- Nanded extended corridor), वाढवण बंदर (Wadhvan Port) आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.