महाड: महाड-पंढरपूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळ बोलेरो पिक-अप वाहनातून (Bolero Pickup Vehicle) खैराची अवैध वाहतूक (Illegal Transportation of Khair Wood) करणाऱ्या आरोपीसह वाहन जप्त करण्यात वनखात्याने मोठी कारवाई (Forest Department Action Mahad) केली आहे.
मुंबई-राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ वनखात्याचे कर्मचारी गस्त घालत असताना एमएच-23-डब्ल्यू-2778 हा बोलेरो पिक-अप संशयास्पद दिसल्याने तपासणी केली असता वाहनात खैराचे सोलिव नग सुमारे 9 घनमीटर (Cubic Metres) आणि हौद्यात खैर सालपा वजन अंदाजे 500 ग्रॅम इतका साठा आढळला.
यावरून खैराच्या मालाची अवैध वाहतूक उघडकीस आली असून वाहनचालक-मालक संदीप उत्तम माने (रा. कारेगव्हाण, ता. बीड, जि. बीड) याला त्वरित अटक करण्यात आली.
या आरोपीवर भारतीय वन अधिनियम 1927 (Indian Forest Act, 1927) अंतर्गत कलम 26(1)(f), 41/2B नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन व खैर लाकडाचा मिळून अंदाजे ₹6 लाखांचा मुद्देमाल (Seized Goods Worth ₹6 Lakh) जप्त करण्यात आला आहे. आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक रोहा (Deputy Conservator of Forests, Roha) आणि सहाय्यक वनसंरक्षक रोहा (Assistant Conservator of Forests, Roha) यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महाड व वनपरिक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.