राष्ट्रीय ताज्या बातम्या

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश

मुंबई : ब्राझीलमधील बेलेम शहरात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेत (Conference of Parties – COP30) भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळात महाराष्ट्रातील भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश करण्यात आला आहे.

COP30 परिषदेमध्ये जगभरातील देश हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र आले आहेत. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामान- अनुकूल धोरणे स्वीकारणे, आणि आवश्यक आर्थिक सहाय्याची व्यवस्था करणे अशा महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रांमध्ये चर्चा व करार होत आहेत.

यापूर्वीच्या COP परिषदांमध्ये भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यंदाच्या COP30 मध्ये भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव करत आहेत.

भाजप नेते संतोष गांगण हे केंद्र सरकारच्या विविध समित्यांचे सदस्य असून अनेक राष्ट्रीय सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत दिशा समितीचे सदस्य असून स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी सतत पाठपुरावा करतात. वेस्ट मॅनेजमेंटसाठी नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित अनेक प्रकल्प त्यांनी सरकारी संस्थांना सुचविले असून काही प्रकल्प यशस्वीपणे अंमलातही आणले गेले आहेत. तसेच ते निसर्ग संवर्धन क्षेत्रात विविध स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमंत्रणानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्यांचा भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळात समावेश केला आहे. COP30 परिषद १० ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही भारताच्या वतीने या परिषदेत सहभागी झाले आहेत.

सदर परिषदेत “हरित भारत” या तत्त्वावर आधारित हवामान कृतीसंदर्भातील भारताचा दृष्टीकोन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवरील हवामान बदलाच्या लढ्यात भारताने केलेले योगदान आणि भविष्यातील भूमिका अधोरेखित करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.

भारताचा शाश्वत विकासाचा मार्ग आणि समावेशक हवामान कृतीचा संदेश जगापर्यंत पोहोचविण्याची ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
त्याचबरोबर “पर्यावरणाचा आदर ही भारतीय संस्कृतीची मूळ ओळख आहे” — हा संदेशही जागतिक समुदायासमोर ठळकपणे मांडला जाणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे