महाराष्ट्र ताज्या बातम्या

अवैध विदेशी नागरिकांवर कारवाई कडक; महाराष्ट्रातही अंमलबजावणी सुरू – फडणवीस

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis speaking in the Assembly on action against illegal foreign nationals and law enforcement measures.

मुंबई: शैक्षणिक आणि वैद्यकीय व्हिसावर भारतात येऊन कालावधी संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

प्रश्नोत्तर तासात भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी नालासोपारा परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा आणि त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग याबाबत प्रश्न उपस्थित केला.

“अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विदेशी नागरिक आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई होणार का? तसेच अवैध पबवर कारवाई केली जाणार का?” असा सवाल त्यांनी केला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गेल्या महिन्यात ६८ विदेशी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्यात आले, तर सध्या १२२ जण तात्पुरत्या निवास केंद्रात आहेत. अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांचे पासपोर्ट आणि प्रवास कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “ज्यांचे पारपत्र कालबाह्य झाले आहे, त्यांना तात्पुरत्या निवास केंद्रात ठेवून त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया राबवली जाईल. तसेच अवैध वास्तव्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.”

मुंबईत येणाऱ्या विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची मुदत पोलिसांकडून नियमित तपासली जाईल आणि कालावधी संपल्यानंतर ते परत गेले का, याची पडताळणीही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चेत विलास तरे, नाना पटोले आणि हेमंत ओगले यांनीही सहभाग घेत मुद्दे उपस्थित केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात