महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘माझी वसुंधरा’ मोहीम वेगात; २०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक, कर्करोग तपासणीला गती

Pankaja Munde speaking in Maharashtra Assembly on Mazi Vasundhara campaign and climate change initiatives

मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून “माझी वसुंधरा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील २८,३२८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, सध्याचे दशक हे इतिहासातील सर्वात उष्ण दशक ठरत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वाढलेले तापमान आणि वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे महाराष्ट्रास मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि नदी प्रदूषण नियंत्रणावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील ४३ अमृत शहरांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विशेष आराखडे तयार करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

२०३५ पर्यंत सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बसांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. सध्याच्या बसेस या शेवटच्या असून, त्यानंतर येणाऱ्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील.
“२०३५ पर्यंत महाराष्ट्र पूर्णपणे इलेक्ट्रिक एसटी बस प्रणालीकडे वळणारे पहिले राज्य ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्करोग तपासणीसाठी मोठी मोहीम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, कर्करोग तपासणी आणि निर्मूलनासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत २.९१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून, ९.८४ लाख मुलींना मोफत एचपीव्ही लस देण्यात आली आहे.

३० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनांतर्गत कॅन्सर उपचार पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांशी संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात