महाराष्ट्र ताज्या बातम्या

माझी वसुंधरा योजनेची व्हॅन महाडमध्ये धुळखात; सत्तांतरानंतर पर्यावरण उपक्रम ठप्प?

MPCB Majhi Vasundhara bamboo display van parked idle in Mahad, showing images of political leaders and environmental campaign branding

महाड: राज्यातील सत्तांतर आणि नेतृत्वातील बदलानंतर अनेक शासकीय उपक्रम ठप्प झाल्याचे चित्र समोर येत आहे. महाडमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेली डिस्प्ले व्हॅन गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी ही सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली होती. बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

काही काळ महाड तालुक्यातील ग्रामीण भागात या व्हॅनद्वारे शेतकऱ्यांना चित्रफितींमधून मार्गदर्शन करण्यात आले. मात्र आता हीच व्हॅन महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात अडगळीच्या जागेत उभी असून तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

Covered in dust and left unattended, the MPCB display van in Mahad highlights administrative neglect of an environmental awareness initiative.

या व्हॅनवर देशाचे पंतप्रधान Narendra Modi, तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde, विद्यमान मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची छायाचित्रे आहेत. मोठ्या थाटामाटात या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले होते.

मात्र गेल्या सहा महिन्यांपासून लाखो रुपयांचा हा प्रकल्प पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत आहे. याबाबत विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले.

एकंदरीत, नेतृत्वातील बदल आणि राजकीय घडामोडींनंतर पर्यावरण जनजागृतीसारखे महत्त्वाचे उपक्रम थंडावल्याचे हे उदाहरण मानले जात आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

2 Comments

  1. Goldie Velasco

    April 8, 2026

    I have been surfing online more than 3 hours today, yet I never found any interesting article like yours. It is pretty worth enough for me. In my view, if all website owners and bloggers made good content as you did, the internet will be a lot more useful than ever before.

  2. sfokcer topsde

    April 8, 2026

    It’s the best time to make a few plans for the future and it is time to be happy. I’ve learn this submit and if I could I desire to recommend you few fascinating issues or suggestions. Maybe you can write next articles relating to this article. I wish to learn even more issues approximately it!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात