महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॅग अहवालातील निरीक्षणांवरून हाफकिनचा मुद्दा विधानसभेत; जयंत पाटील यांची ॲक्शन टेकन रिपोर्टची मागणी

विधानसभेत हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळातील कथित अनियमिततांबाबत कॅग अहवालाचा मुद्दा उपस्थित करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील.

मुंबई : हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळातील कथित आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततांचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) अहवालातील निरीक्षणांचा संदर्भ देत सरकारकडे स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली.

जयंत पाटील यांनी सभागृहात दावा केला की, पोलिओ लसींच्या वाहतुकीबाबत विमान वाहतुकीची बिले सादर करण्यात आली, मात्र प्रत्यक्ष वाहतूक रस्तेमार्गे झाल्याचे कॅगच्या निरीक्षणांत नमूद आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सूचनांचे पालन न झाल्यामुळे हाफकिनला मोठ्या मूल्याचे कंत्राट गमवावे लागल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, परदेशातील कथित बोगस खात्यात निधी वर्ग करणे, चीनमधून यंत्रसामग्री खरेदीसाठी आगाऊ रक्कम अडकणे, नियमबाह्य नियुक्त्या आणि अधिकाऱ्यांबाबतच्या तक्रारी अशा विविध मुद्द्यांचाही त्यांनी उल्लेख केला.

या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि सरकारने ॲक्शन टेकन रिपोर्ट (ATR) विधानसभेत सादर करावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

हाफकिन ही राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असल्याने कॅगच्या निरीक्षणांवर सरकारची भूमिका आणि पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. Herman Perron

    July 9, 2026

    I don’t even know the way I ended up right here, but I thought this submit was good. I do not realize who you might be however certainly you are going to a famous blogger in the event you aren’t already 😉 Cheers!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात