महाराष्ट्र ताज्या बातम्या

दलित-आदिवासी-ओबीसींच्या प्रश्नांसाठी बीआरएसपीचा १५ डिसेंबरला नागपुरात मोर्चा

बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने मुंबईतील वरळी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत

हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधणार; दहा प्रमुख मागण्यांसह विदर्भ-मराठवाड्याच्या आर्थिक अनुशेषाचाही मुद्दा

नागपूर : दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी)तर्फे येत्या १५ डिसेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथील रविभवन येथे झालेल्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. एससी-एसटी उपवर्गीकरणाचा प्रश्न, आदिवासींचे डिलिस्टिंग, एससी-एसटी बजेटमधील कपात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष, ओबीसी जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम, मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण, भटक्या-विमुक्त समाजाचे सर्वेक्षण तसेच विदर्भ आणि मराठवाड्याचा आर्थिक अनुशेष दूर करणे, अशा विविध मुद्द्यांसह एकूण दहा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

विदर्भातील संघटनात्मक फेरबदल

बैठकीत बीआरएसपीच्या विदर्भ प्रदेश कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. विविध जिल्ह्यांतील जबाबदाऱ्यांमध्ये बदल करून नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली. गडचिरोलीतील अॅड. संजय जनबंधू यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. १५ डिसेंबरच्या मोर्चाची तयारी व्यापक पातळीवर करण्यासाठी जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर बैठका घेण्याचे निर्देश डॉ. माने यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

१ ऑक्टोबरला भंडाऱ्यात जाहीर सभा

याशिवाय १ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा येथे बीआरएसपी स्थापना दिन आणि बहुजन नायक कांशीराम स्मृती दिनानिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. हिवाळी अधिवेशनावरील मोर्चात बीआरएसपीच्या कार्यकर्त्यांसह भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी दलित एकता परिषद या संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे पक्षाने सांगितले. बैठकीला विदर्भातील विविध जिल्ह्यांचे बीआरएसपी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात