महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदू एकता आंदोलनच्या सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अस्मिता लाड

हिंदू एकता आंदोलनच्या सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर अस्मिता लाड यांना नियुक्तीपत्र देताना नितीन शिंदे

प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; महिलांसाठी स्वतंत्र संघटनात्मक उपक्रम राबविण्याची घोषणा

महाड : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या सातारा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अस्मिता लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संघटनेने महिलांसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्रिय संघटनात्मक रचना उभारण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. कथित “लव्ह जिहाद” प्रकरणांमध्ये अडकलेल्या किंवा संकटात सापडलेल्या महिला व मुलींना मदत, समुपदेशन आणि न्याय मिळवून देण्यासाठी महिला आघाडी काम करेल, असा दावा संघटनेने केला.

अस्मिता लाड या साताऱ्यातील हिंदू एकता आंदोलनाशी संबंधित दिवंगत माजी नगरसेवक सुनील उर्फ बटू संकपाळ यांच्या कन्या आहेत. या नियुक्तीवेळी बोलताना नितीन शिंदे यांनी संकपाळ यांच्या पूर्वीच्या आंदोलनांचा उल्लेख केला. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीच्या निषेधार्थ अमेरिकन वकिलातीशी संबंधित ठिकाणी बॉम्ब टाकल्याच्या प्रकरणात संकपाळ यांनी साडेतीन वर्ष कारावास भोगल्याचा दावा शिंदे यांनी केला. या पार्श्वभूमीवर अस्मिता लाड या महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर काम करतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू एकता आंदोलनचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, नगरसेवक सागर पावसे, संतोष शेंडे, गजानन माने, पृतांजली संकपाळ, संदीप सरडे, निशा लोहार, संगीता भोसले, अक्षय शेलार, अक्षय शिंदे, निखिल राजपूत, अजिंक्य संपकाळ, अविष्कार सपकाळ, शंकर माळवदे, गणेश भोसले, सुनील बुचकर, दत्तात्रय शिंदे, अजय धोगडे, शिवराज इंगवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात