ताज्या बातम्या राष्ट्रीय

ही प्रगतीशील महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही – रामदास आठवले

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

नांदेड आणि औरंगाबादमधील सरकारी रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची अंत्यत दु:खद, वेदनादायक दुर्घटना घडली. औषधांच्या तुटवड्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होणे प्रगतीशील महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही, अशा परखड शब्दात सरकारला कानपिचक्या देत, या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ३५ रुग्णांचा पुरेशा औषधाअभावी मृत्यु झाल्याची दुर्घटना उघडकीस आल्यानंतर लगेच औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. औषधाविना ४५ रुग्णांचे मृत्यु होणे ही अत्यंत गंभीरच बाब आहे. नांदेड आणि औरंगाबादमधील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावी, तसेच यापूर्वी रुग्णालयात आग लागल्याच्याही दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच रुग्णालयाचे फायर ऑडिटही केले पाहिजे. राज्य शासनाने सर्व रुग्णालयात औषधे आणि यंत्रणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यात कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांनाही कठोर शिक्षा केली पाहिजे अशीही मागणी आठवले यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे