Twitter : @therajkaran
मुंबई
राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आणण्यात खारीचा नव्हे तर घारीचा वाटा उचलणारे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या धारशिव जिल्ह्यात देखील मुलांचे मृत्यू होत आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला ह.
यासंदर्भात मोटे म्हणाले की, आधी ठाणे, त्यांनतर नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर याठिकाणी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहे, मृत्यूचा तोच तांडव आता धाराशिव जिल्ह्यात देखील सुरू झाला आहे. जिल्ह्यातील भूम येथील ग्रामीण रुग्णालयात चार महिन्याचा बलिकेचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला आहे. याला आरोग्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप मोटे यांनी केला आहे.
ते म्हणाले, आरोग्य विभागाचा हा ढिसाळपणा सामान्य जनतेत भीती आणि चीड निर्माण करणारा आहे. राज्यात घडत असलेल्या या घटना अत्यंत दुर्दैवी असून याला सर्वस्वी राज्याचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. मी या सर्व घटनांचा आणि आरोग्य मंत्र्याचा जाहीर निषेध करतो, असेही राहुल मोटे म्हणाले.