ताज्या बातम्या राष्ट्रीय

गेहलोतांचा अहंकार की अंतर्गत कलह, राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? ही आहेत ५ कारणं

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव (congress lost in Rajasthan) झाला आहे. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली परंपरा पुन्हा एकदा कायम असून काँग्रेसनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिलेल्या घोषणांकडे जनतेने दुर्लक्ष केल्याचं दिसत असून भाजपला सत्तेत बसवलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राजस्थानात १९९ पैकी भाजपला ११५, काँग्रेसला ७० आणि इतर पक्ष १४ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अपयशाची नेमकी काय कारणं आहेत.

  • पक्षांतर्गत कलह
    राजस्थानात काँग्रेसच्या पराभवामागे एक मोठं कारण म्हणजे पक्षातंर्गत कलह. पक्षात अनेक नेते नाराज होते, मात्र गेहलोत त्यांना सांभाळू शकले नाहीत. पक्षाअंतर्गत गटबाजी आणि अनेक बंडखोर नेत्यांनी पक्षांतील स्थिती बिघडवली. अनेक नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर काही भाजपसोबत गेले.
  • सचिन पायलट आणि गेहलोतमधील संघर्ष
    सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील संघर्ष देशात चर्चेचा विषय राहिला. दोन्ही नेते कामाव्यतिरिक्त एकमेकांविरोधातील वादाला अधिक महत्त्व देत राहिले. सरकार स्थापन होतान दोघांमधील संघर्ष सुरू झाला तो थांबलाच नाही. अनेकदा पक्षश्रेष्ठींनी दोघांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, इतकच नाही तर राहुल गांधींनी स्वत: प्रचारादरम्यान दोघांना एकाच मंचावर आणलं आणि पक्षात सर्व ठिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती वेगळीच होती.
  • महिलांवरील अत्याचार
    राजस्थानच्या निवणुकीत कायदा आणि सुव्यवस्था हादेखील महत्त्वाचा मुद्दा होता. महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. ज्यावर भाजपने काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपने गेहलोत सरकारवर महिलांवरील अत्याचारात राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचा आरोप केला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काही घटनांमध्ये प्रतिक्रिया न दिल्यामुळेही निशाण्यावर आले.
  • अशोक गेहलोतांचा अहंकार?
    राजस्थानात काँग्रेसच्या पराभवामागे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांटा अहंकार कारणीभूत मानला जात आहे. त्यांचा अतिआत्मविश्वास आणि अहंकारामुळे त्यांना मोठा फटका बसला. गेहलोतांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर अंहकारी असल्याचा आरोप लावला आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी गेहलोत आपली बाजू ऐकून घेत नसल्याचा आरोप केला आहे. अनेकदा मीडियासमोर गेहलोत यांनी सचिन पायलट निकामी आणि गद्दार म्हटलं होतं.
  • पेपर लिक प्रकरण महागात पडलं
    राजस्थानात भरती परीक्षेतील पेपर लिक प्रकरण काँग्रेसला महागात पडलं. भाजपने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरलं. पेपर लिक प्रकरणामुळे तरुण वर्ग काँग्रेसवर नाराज होता. गेल्या पाच वर्षात गेहलोतांच्या कार्यकाळात परीक्षा पेपर लिक होण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे