नागपूर
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करावी अशी मागणी केली जात असताना राज्य सरकारने ओबीसी विभागासाठी 3,377 कोटींची भलीमोठी तरतूद केल्याचं वृत्त समोर आलं आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला.
ओबीसी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सामाजिक न्याय भवन येथे अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार परिणय फुके, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, सुभाष घाटे, दिनेश चोखारे, रामदास कामडी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
महाज्योतीसाठी २६९ कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५७ कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी ५६ कोटी, अमृत संस्थेसाठी १५ कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ११९२ कोटींची तरतूद केली आहे.
याशिवाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्यात येतील, असंही सांगण्यात आलं.