ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान होणार

मुंबई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis will be awarded an honorary doctorate) प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्‍यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात