ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोठी बातमी! नागपुरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला प्रियंका आणि सोनिया गांधी अनुपस्थितीत!

नवी दिल्ली

नागपूरात आज काँग्रेसचा १३९ स्थापना दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. याची सर्व तयारी झाली असून देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी नागपूरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला अनुपस्थितीत राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीत स्थापनादिन सोहळ्यानंतर ते नागपूरात येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. राहुल गांधीदेखील खराब हवामानामुळे एक तास उशिरा नागपूरात दाखल होणार आहेत.

सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने ते नागपुरात उपस्थित राहू शकणार नाहीत. राहुल गांधी दुपारी नागपुरात दाखल होणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसची “है तैयार हम” महारॅली होणार आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकणार आहे. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसशासित राज्यातील किमान तीन मुख्यमंत्री तसंच काँग्रेस कार्यसमितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता महारॅली सुरु होणार आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात